ज्ञानदीप विद्यालयाचे काम जिल्ह्याला मार्गदर्शक – दिलीपराव थोरे 

अहमदनगर- अतिशय चिकाटीने, धैर्यशीलपणोन अणि स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी रुपाने प्रेरीत होऊन हाती घेतलेले उपक्रम, कार्य तडीस नेतात. शाळा व गाव यांचा उत्तम समन्वय साधुन शिक्षण व अध्यात्म यांची सांगड घालुन गावचा विकास साधला आहे. गरीब व गरजु वंचित घटकांना मदत खरोखरच इतरांसाठी प्रेरणादायी आहे. ज्ञानदीप विद्यालयाचे काम जिल्ह्याला मार्गदर्शक ठरेल. देशाचा स्वावलंबी व परिपुर्ण बनविण्यासाठी मी स्वत: सहभाग देण्यासाठी तयार आहे अशी मनात भावना असेल तरच स्वातंत्र्य चिरायू व वैभव प्राप्त करुन देणार ठरेल आणि देश महासत्ता बनेल असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी दिलीपराव थोरे यांनी अध्यक्षस्थानावरुन केले.

मौजे वाळुंज, ता.नगर येथील ज्ञानदीप विद्यालयात क्रांती दिनाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशाचे वाटप विद्यालयात उभारण्यात आलेल्या माजी विद्यार्थी कल्याण निधीतून करण्यात आले व वृक्षारोपण आणि विद्यालयाने केलेले रेन वॉटर हार्वेस्टींगची पाहणी पाहुण्यांनी केली.

याप्रसंगी जिल्हा शिक्षणाधिकारी नियुक्तीबद्दल दिलीपराव थोरे, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत सोनार तर अखिल भारतीय जैन कॉन्फरन्सच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अशोक बलदोटा व राजेंद्र बलदोटा यांचा सत्कार झाला.

गरीब विद्यार्थी कल्याण निधीसाठी मेजर बाजीराव दरेकर यांनी आपले एक महिन्याचे निवृत्ती वेतन 14716 रू. तर अशोक बलदोटा यांनी कै. कमलाबाई शांतीलाल बलदोटा यांचे स्मरणार्थ रोख 7000 रू. आणि गावचे सरपंच बाळासाहेब दरेकर यांनी रोख 23100 रू. देणगी दिली.

कार्यक्रमात उपशिक्षणाधिकारी पांडुरंग मगर, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत सोनार, संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब दरेकर, संस्था सचिव देवराम दरेकर, उपाध्यक्ष प्रा. जगन्नाथ हिंगे, प्रा. सुनील पंडित, राजुशेठ बलदोटा, मेजर बाजीराव दरेकर, आदींची भाषणे झाली.

याप्रसंगी संचालक गोरखनाथ हिंगे, मच्छिंद्रनाथ हिंगे, मार्केट कमिटी संचालक संतोष म्हस्के, प्रा. सुनील धुमाळ, मुख्याध्यापक प्रभाकर बोडखे, लगड सर, हभप धाडगे महाराज, चेअरमन सुखदेव दरेकर, राहिदास शेळमकर, संतोष गायकवाड, दत्तराज खरपुडे, दशरथ दरेकर, संदीप मोरे आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन शेवाळे सर तर आभार शेख सर यांनी मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा