‘डेट स्किम’ कडे दुर्लक्ष नको

गुंतवणूकदारांनी काळानुसार गुंतवणूक करायला हवी. आता शेअरबाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार सुरू आहे. या काळात डेट फंड काही प्रमाणात सुरक्षित परतावा देत आहेत.त्यामुळे गुंतवणुकीसाठी डेट फंडमधील गुंतवणूक तुलनेने सुरक्षित मानली जाते. अशा फंडमध्ये एकरक्कमी किंवा एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा विचार करायला हवा. बाजारातील सध्याचे वातावरण पाहता एकाच पर्यायात सर्व गुंतवणूक ठेवण्यापेक्षा त्याची विभागणी करावी. सोने, इक्विटी, पोस्टाच्या बचत योजना, रिकरिंग खाते, मुदत ठेवी, शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेट हे गुंतवणूकीचे पर्याय आहेत. आपल्या जोखमीनुसार पर्यायांची निवड करायला हवी. डेट फंड हे मुदत ठेवीप्रमाणे किंवा काही प्रमाणात अधिक व्याज देणारी स्किम आहे.

भारतातील एक जुनी म्हण खूप प्रसिद्ध आहे. जो जेवढ्या वेगाने पळतो, तो तेवढ्याच वेगाने पडतो. जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्याचा विचार करता, तेव्हा हीच बाब लागू होते. इक्विटी किंवा शेअरमधून चांगला परतावा मिळतो, ही गोष्ट गुंतवणुकदारांच्या मनात अगदी घट्ट घर करुन बसली आहे. ही खरी असली तरी आपण अधिक परताव्याचा विचार करत असाल तर त्याप्रमाणात आपल्याला जोखीमही पत्करावी लागेल. कदाचित एखाद्या शेअरने आपण मालामाल होऊ शकता किंवा गुंतवणूक शून्यावर देखील येऊ शकते. म्हणूनच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा विचार केला जात असताना आपल्याला डेट स्किमकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

स्थिर परताव्याची हमी : डेट योजना या चांगल्या, निश्‍चित आणि स्थिर परतावा देतात. सध्याचा काळ पाहिला तर गेल्या एक महिन्यात शेअरबाजार सात टक्क्यांनी घसरला आहे. जर आपण एक जुलै रोजी इक्विटीत पैसा टाकला असेल तर त्या गुंतवणुकीत 7 टक्क्याने नुकसान झाले आहे. मात्र हाच पैसा डेटमध्ये राहिला असता तर पाच ते सात टक्के परतावा दिला असता. याचाच अर्थ असा की काळानुसार गुंतवणूक करण्याचा विचार करायला हवा. त्यामुळे आपण वेळोवेळी डेटमध्ये पैसा टाकायला हवा. मग एकरकमी असो किंवा एसआयपी असो. अर्थात आपण एसआयपीचा विचार केल्यास ती गुंतवणूक उत्तम ठरू शकते.

निधीत वाढ किंवा कमीची शक्यता : तार्किकदृष्ट्या डेट स्किममध्ये डेट फंडवर गुंतवणूक केली जाते. सरकार, कॉर्पोरेट, बँका आणि एनबीएफचे बॉंड किंवा योजनातून डेटफंडमध्ये गुंतवणूक केली जाते. डेट स्किममध्ये सर्वसाधारणपणे मुदत ठेवीवर आकारल्या जाणार्‍या व्याजदराप्रमाणे परतावा मिळत असतो. अर्थात व्याजदराच्या बदलामुळे फंडात कमी किंवा वाढ राहण्याची शक्यता असते. जर या संस्थांच्या बॉंडची क्रेडिट रेटिंग कमी झाल्यास भांडवलही कमी राहते. अर्थात डेटस फंडसचा पैसा हा निश्‍चित परतावा देणार्‍या बॉंडमध्ये गुंतवला जातो. त्यामुळे नुकसानीचा धोका हा कमीच राहतो. अशा प्रकारच्या फंडमधील गुंतवणूकीतून अधिक परताव्याची आशा धरू नये. एका अर्थाने मुदत ठेवीपेक्षा चांगला परतावा देताता.

डेट आणि लिक्विड फंडचे एकीकरण : व्यक्तिगत गुंतवणूकदारांसाठी डेट आणि लिक्विड फंड हे एक चांगला परतावा देणारा पर्याय आहे. बचत खाते, टर्म डिपॉझिटच्या तुलनेत हा परतावा सरस ठरतो. एकीकडे फंडमध्ये तरलता असते तर दुसरीकडे परताव्यात भरपूर सुविधा असते. भांडवल बाजारात नियामक सेबीने देखील डेट स्किमचे वर्गीकरण केले आहे. डेट फंडचा पोर्टफोरासरी मॅच्यूरिटी आणि क्रेडिट अलोकेशनवर आधारित आहे. व्यक्तिगत गुंतवणूकदार हा आपल्या जोखमीच्या आधारावर गुंतवणूकीचा वेळोवेळी निर्णय घेऊ शकतो. जर एखाद्याला कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी अल्ट्रा लो ड्यूरेशन स्किम उत्तम आहे. ज्यांना अधिक परतावा हवा असेल तर त्यांनी दिर्घकाळासाठी गुंतवणूक करायला हरकत नाही.

डेट फंडमध्येही जोखीम : डेट केंद्रीत योजनातही काही प्रमाणात जोखीम असते. त्याचा परिणाम परताव्यावर होतो. यात व्याजदराची दिशा आणि डेट फंड जारी करणार्‍या संस्थेची क्रेडिट क्वालिटीचा समावेश आहे. त्यामुळे व्यक्तिगत गुंतवणूकादारांनी काळजीपूर्वकच गुंतवणूक करायला हवी. डेट केंद्रित योजनांत गुंतवणूक करण्याचा विचार करताना कोर असेट अलोकेशनच्या पद्धतीचे पालन करायला हवे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा