दार्जीलिंग

हेसिलीगुरीपासून ४९ मैलांवर आहे .हे पूर्वेकडील  भारताचे  प्रसिध्द हील स्टेशन आहे ह्याची उंची  ७००४ फुट आहे. येथून ११ कि.मी अंतरावरच्या टायगर हिल्स येथे जीपने प्रवास करून उगवतानाचा सूर्य बघितलाच पाहिजे. सूर्योदयाच्या वेळी कांचन गंगा ह्या शिखरावर सोनेरी किरणे दिसतात. ते दृश्य जन्मभर लक्षात राहील इतके सुरेख आहे. हे दृश्य  क्षणभरच दिसते. भल्या पहाटे उठून तिथे पोहोचावे लागते. पर्यटकांची तेथे बरीच गर्दी असते

हिमालयाची अनेक बर्फाच्छादित शिखरे येथून दिसतात. दार्जीलिंग हे सन १८५० च्या सुमारास इंग्रजांनी वसविलेले स्थळ आहे. येथे बंगालची उन्हाळ्याची राजधानी असते. येथे राजभवनच्या जवळ बसून शेजारील दरी क्षणात धुक्याने भरते व क्षणात धुके निघून जाते हे बघण्यात व अनुभवण्यात फार मोठा आनंद आहे. असे धुके काही प्रमाणात पावसाळ्यात लोणावळा खंडाळा भागात काही प्रमाणात अनुभवायला येते.

दार्जीलिंगला कोलकात्याहून सिलीगुरीपर्यंत ब्रॉडगेजने प्रवास करून पुढे न्यारोगेजच्या गाडीने  प्रवास करण्याची मजा काही औरच आहे. माथेरानला वा सिमल्याला अशीच आगगाडी आहे. बसरीया येथील रेल्वे लूप पण लक्षणीय आहे. दार्जीलिंग ते रणजीत व्हयाली हा रोपवेचा प्रवास ५ मैलांचा आहे . त्याचाही आनंद वेगळाच. ७००० फुटांवरून आपण बऱ्याच खाली जातो. हा अनुभव स्वित्झर्लंड येथील माउंट टीटलीसहून खाली रोपवेने उतरतो अशा तऱ्हेचा आहे. धूम हे रेल्वे स्थानक  ७००० फुट उंचीवर आहे .

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा