नगरमध्ये श्री सच्चिया माता ओसियाची महाआरती नृत्य नाटिका व भक्तीसंध्या

अहमदनगर – शहरांत तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सकल राजस्थानी समाज वास्तव्य आहे.सकल राजस्थानी समाजाची श्रध्दास्थान असलेली श्री सच्चियाय ओसिया माता राजस्थान मध्ये ओसिया या गावी असुन दरवर्षी भाविक भक्त राजस्थानला दर्शनासाठी मोठ्या श्रध्देने जात असतात याचे औचित्य साधून सकल राजस्थानी युवा मंच व जैन कॉन्फरन्सच्यावतीने भव्य अशा महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी विशेषतः राजस्थान, गुजरात व कोलकत्ता चे कलाकार यांचा संच असुन 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत माताजीच्या आरतीसाठी तेथील पुजारी उपस्थित राहणार आहेत.

त्यामुळे सर्व परिसर भक्तिमय होणार आहे. सर्व भाविक भक्तासांठी गौतमप्रसादीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वानी याचा लाभ घ्यावा

सकल राजस्थानी युवा मंच हा नेहमीच सर्व युवक एकत्र येऊन समाजामध्ये एकी वाढवावी यासाठी प्रयत्नशील असतो लोकांना मदत व्हावी तसेच समाज एकत्र यावा यासाठी प्रयत्नशील असतात नवरात्र उत्सवात दरवर्षी रासदाडिंया, वृक्षारोपण, क्रेझी क्रिकेट, पोलीसांसोबत दीवाली मेळावा असे विविध उपक्रम राबवत असतात हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विलास शेठ लोढा संतोषशेठ गुगळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

वसंत लोढा, धनेश कोठारी, राजेंद्र गांधी, उमेश बोरा, अमित मुथ्था, अतल शिंगवी, मेहुल भंडारी, सागर देसरडा, मनोज पितळे, निरज काबरा, सचीन कटारिया, रूपेश पारख, योगर्ष चुत्तर, अभिजीत मुथा, राहुल भंडारी, हितेश बलदोटा व इत्तर सदस्य कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत सकल राजस्थानी युवा मंच व जैन कॉन्फरन्सच्यावतीने सर्व समाज बांधवांनी या भव्य दिव्य महाआरती भक्तिसंध्याचा लाभ घ्यावा, अशी विनंती अधिक माहितीसाठी मनोज पितळे 9822260203, नवरत्न डागा 9421334361, संभव काठेड 9405001381 यांना संपर्क साधावा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा