मार्ग मोकळा

ब्राझिलचे व्हॉट्सअपची पेमेंट सेवा सादर करण्यासाठी मागील काही दिवसांपासून सुरु असलेले प्रयत्न आता अपयशी ठरले असून ब्राझीलने यांची परवानगी रद्द केली आहे. कारण यामध्ये पर्यावरणाला धोका असल्याचे कारण दाखवत ही मान्यता दिली नसल्याची माहिती आहे. परंतु यावर सध्या व्हॉट्सअपला आपली सेवा भारतात सादर करण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती देण्यात येत आहे.

यासंदर्भात बँका आणि रेग्युलेटर्स यांच्यात मागील दोन वर्षापासून चर्चा करण्यात येत आहे. व्हॉट्सअपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात क्हॉट्सअप पे सुरु करण्यासाठीचे काम वेगाने सुरु करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. कॉम्पीटीशन कमीशन ऑफ इंडिया यांनी व्हॉट्सअपची सहयोगी कंपनी फेसबुकला 5.7 अब्ज डॉलर जिओ प्लॅटफार्ममध्ये गुंतवणूक करण्यास मान्यता दिली आहे. तसेच पडताळणी करण्यात येत असलेल्या व्हॉट्सअप पे दहा लाख लोकांच्या सहमतीने सादर करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

सध्या युपीआयच्या आधारे पेमेंट सुविधा क्षेत्रात गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि अॅमेझॉन पे मोठ्या प्रमाणात कार्यरत असून यामध्ये व्हॉट्सअप जिओ मार्टचा हिस्सा होत असल्याने भारतामधील व्हॉट्सअप पे चा मार्ग मोकळा होण्याचे दाट संकेत व्यक्त केले जात आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा