3600 वर्षांपूर्वीचा डिस्पोजेबल कप !

प्लास्टिकच्या कपाऐवजी वेगवेगळ्या प्रकारचे डिस्पोजेबल कप सध्या बनवले जात आहेत. अशा प्रकारचे कप हजारो वर्षांपूर्वीही बनवले जात होते हे विशेष. ब्रिटनची राजधानी लंडनच्या एका संग्रहालयात अशा एका कपचे सध्या प्रदर्शन केले जात आहे. हा कप 3600 वर्षांपूर्वीचा आहे.

मिनोअन संस्कृतीत ग्रीसच्या क्रेट बेटावर चिकनमातीने बनलेले असे कप वापरले जात होते. या कपची निर्मिती 1700 ते 1600 इसवी सनपूर्व या काळात झाली. ही संस्कृती 2700 ते 1450 इसवी सनपूर्व पर्यंत अस्तित्वात होती. संशोधकांनी म्हटले आहे की या कपाचा वापर मद्यपानासाठी केला जात असे आणि त्यानंतर हे कप ङ्गेकून दिले जात असत. यावरून असे दिसते की ‘डिस्पोजेबल’ तंत्र हे आधुनिक युगातील नाही.

जगामध्ये 1990 च्या दशकापासून एअरपोर्ट, रेस्टॉरंट आणि विमानांमध्ये डिस्पोजेबल भांड्यांचा वापर वाढला आहे. ब्रिटिश म्युझियमची क्युरेटर ज्युलिया फर्ले हिने सांगितले, त्या काळातील उच्च वर्गही मोठ्या मेजवान्यांचे आयोजन करीत असे. त्यामध्ये अशा डिस्पोजेबल कपांचा वापर केला जाई. मेजवानीनंतर फेकलेल्या डिस्पोजेबल कपांची संख्या पाहूनच आयोजन आपल्या सांपत्तीक स्थितीचा देखावा करत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा