बांगलादेशला विजयाच्या उन्मादाची शिक्षा; भारतीयदेखील दोषी!

दुबई ˆ आयसीसी 19 वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील विजयानंतर बांगलादेश संघातील खेळाडूंनी केलेल्या धक्काबुक्की प्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाच खेळाडूंवर दोषी ठरवले. या पाच खेळाडूंमध्ये दोघा भारतीयांचा देखील समावेश आहे.

अंतिम सामन्यात भारतावर विजय मिळवल्यानंतर उत्साहाच्या भरात बांगलादेशी खेळाडू भारतीय खेळाडूंशी भिडले होते. विजयानंतर सेलिब्रेशन करताना दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाली, ज्याचं रुपांतर धक्काबुक्कीत झाले. मैदानावरील या प्रकरणाची दखल आयसीसीने घेतली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा