‘कोरोना’ हा नैसर्गिक विषाणू नाही, तो प्रयोगशाळेत तयार करण्यात आला – ना. नितीन गडकरी

नवी दिल्ली ‘कोरोना’ हा नैसर्गिक विषाणू नाही, तो प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलत होते.

आपल्याला कोरोनासोबत जगण्याची कला आत्मसात करावी लागेल. कारण कोरोना हा नैसर्गिक विषाणू नाही. हा प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेला कृत्रिम विषाणू आहे. सध्या जगातील अनेक देश या विषाणूवर मात करणारी लस शोधत असल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले.

चीनच्या वुहान शहरात सर्वप्रथम कोरोनाचा विषाणू आढळून आला होता. यानंतर हा व्हायरस जगभरात पसरला असून आतापर्यंत कोरोनामुळे अडीच लाख लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यापूर्वी अमेरिकेने कोरोना हा चीननिर्मित व्हायरस असल्याचा जाहीर आरोप केला होता. यावरुन दोन्ही देशांमध्ये शाब्दिक युद्धही रंगले होते. मात्र, ना. नितीन गडकरी यांच्या रुपाने भारताने प्रथमच कोरोनाच्या उत्पत्तीसंदर्भात थेटपणे भाष्य केले आहे. कोरोना सर्वप्रथम चीनमध्ये आढळून आला होता. परिणामी गडकरी यांच्या विधानचा रोख अप्रत्यक्षपणे चीनकडेच असल्याचे दिसत आहे.

कोरोनाच्या निदानासाठी प्रभावी चाचणी (टेस्टिंग) पद्धतीची गरज आहे. जेणेकरून कोरोनाबाधित व्यक्तींना तातडीने ओळखता येईल, असे गडकरी यांनी म्हटले. मात्र, आता भारताने आणि एकूणच जगाने कोरोनाशी लढण्याची तयारी केली आहे. अनेक देशांतील शास्त्रज्ञ कोरोनावरील लसीसाठी संशोधन करत आहेत. त्यामुळे एकदा का लस मिळाली की पुन्हा सकारात्मक वातावरण निर्माण होईल. यानंतर सगळ्या समस्या संपुष्टात येतील, असा विश्वास ना. गडकरी यांनी व्यक्त केला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा