जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापराच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला

मुंबई – जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापराच, दुकानात जाऊन मास्क विकत घेण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरीही कापडाचा मास्क तयार करा आणि तो वापरा. किंवा स्वच्छ कपडा, रुमाल वापरा. मात्र हे मास्क हे छत्रीसारखे वापरु नका. ज्याचा मास्क आहे तो त्यानेच वापरावा. हे मास्क अत्यंत दक्षतेने वापरा. एकाचा मास्क दुसऱ्याने वापरु नका, वापरलेला मास्क कुठेही फेकू नका. सुरक्षित जागा बघून असे मास्क नष्ट करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

आपण जर घराबाहेर वस्तूंसाठी घराबाहेर पडणार असणार तेव्हा पुढचे काही दिवस मास्क वापरले पाहिजेत. त्यात गैर काहीच नाही. घरातल्या स्वच्छ कापडाने चेहरा कव्हर करता येऊ शकतो. पण छत्रीसारखा तो घरातल्या सर्व सदस्यांनी एकच वापरायचा नाही. वापरलेले मास्क कचऱ्यात तसेच फेकून न टाकता काळजीपूर्वक आणि सुरक्षित जागा पाहून जाळून टाका, असेही ते म्हणाले.

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व जण मास्क लावून बसलेले छायाचित्र आपण पाहिले असेलच. ही पहिली अशी व्हिडीओ कॉन्फरन्स होती. सर्व मंत्र्यांनी एकमेकांत अंतर पाळले होते, मात्र मानसिकदृष्ट्या आम्ही एक होतो आणि आहोत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एक टीम म्हणून त्यांनी बऱ्याच सूचना केल्या आहेत, असेही ते म्हणाले.

मला कल्पना आहे कोरोनाचा रुग्ण आपल्या राज्यात  सापडून आता ४ आठवडे पूर्ण झाले. आपल्याकडे रुग्णांचे आकडे वाढताहेत ही वस्तुस्थिती आहे, चिंतेची बाब असली तर घाबरून जाऊ नका. आपण सर्व ताकदीनिशी प्रयत्न करीत आहोत. आपल्याकडे मला रुग्णांमध्ये थोडीशीही वाढ नको असे मी सांगितले आहे.कोरोना आपल्यामागे लागला आहे पण आपण ही सर्व जण कोरोनाच्या मागे हात धुवून लागलो आहोत, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत २१ हजार जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. २२०० लोकांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. १५ ते १७ हजार चाचण्या आत्तापर्यंत झाल्या आहेत. ज्यांची लक्षणे सौम्य आहेत असे ६१० रुग्ण आहेत. ११० रुग्ण असे आहेत ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत. त्यापैकी २२ गंभीर आहेत. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६४ आहे. विषाणूचा हा गुणाकाराचा काळ आहे. मुंबईत चिंतेचं वातावरण आहे मान्य आहे. मात्र मुंबईत आणि पुण्यात चाचण्या वाढवल्या आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा