चिकूचे रायते 

साहित्य – २५० ग्रॅ चिकू, अर्धा लि. गोड घट्ट मलईचं दही, दोन चमचे भाजलेले जिरे, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धा चमचा भरडलेली काळी मिरी, एक चमचा साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार.

पाककृती –  चिकूच्या फोडी करुन घ्याव्यात. दही चांगलं घोटून त्यामध्ये चवीनुसार साखर, लिंबाचा रस, जिरे, कोथिंबीर, काळीमिरी घालावी. सारे जिन्नस मिश्रणात नीट एकजीव करुन घ्यावेत. नंतर त्यामध्ये चिकूच्या फोडी घालाव्यात व थोडावेळ रायते गार होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे.

टिप- रायत्यासाठी शक्यतो कडक चिकू घ्यावेत व  दही घट्ट रहाण्यासाठी मिक्सरमधून घोटून घेऊ नये.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा