नगर येथे चर्मकार समाजाचा रविवारी वधु-वर मेळावा

अहमदनगर- चर्मकार उठाव संघ व अहमदनगर जिल्हा चर्मकार समाज वधु-वर सुचक व पालक परिचय मंडळातर्फे नगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय स्वस्तिक चौक येथे रविवारी (दि. 19) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत वधु-वर सुचक व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे मंडळाचे अध्यक्ष माणिकराव नवसुपे व केंद्रप्रमुख रावसाहेब कानडे यांनी सांगितले.

सदर मेळाव्याचे उद्घाटन जेष्ठ साहित्यीक, कवी आ. लहु कानडे व आ. संग्राम जगताप यांचे हस्ते केले जाईल. तसेच या कार्यक्रमास महापौर बाबासाहेब वाकळे पाटील व नगरसेवक डॉ. सागर बोरुडे व नगरसेवक सुनिल त्र्यंबके, चर्मकार उठाव संघाचे अध्यक्ष अशोकराव कानडे तर प्रमुख पाहुणे म्हणुन चर्मकार समाजाचे उदयोजक अंकुशराव कानडे उपस्थित राहणार आहे.

मेळाव्याविषयी सांगताना खजिनदार अॅड. राजाराम केदार यांनी सांगितले की, गेल्या तेरा वर्षापासुन आमचा ग्रुप केवळ समाजातील विवाहेच्छुक मुला- मुलींचे लग्न जुळविणे सुकर व्हावे याचसाठी हा मेळावा घेत आहोत. मंडळाचा हा 18 वा वधु-वर मेळावा असुन आतापर्यंत अनेक मुला-मुलींचे विवाह जुळवण्यात मदत झालेली आहे. नांव नोंदणी मोफत ठेवलेली आहे.

तरी समाज बांधवांनी मेळाव्यास पालकांनी मुलां- मुलींसह व सोबत पोस्टकार्ड साईज फोटासह उपस्थित रहावे. या कार्याक्रमाचा समाजाने लाभ घेण्याचे आवाहन सचिव विलास सोनवणे, सिकंदर नकटे यांच्या सह मंडळातील सर्व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी माणिक नवसुपे, मो. 976656087309, रावसाहेब कानडे, मो. 9890673045, अॅड. राजाराम केदार, मो. 9422868944, अजिनाथ खरात, मो. 9922907762 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा