केडगावच्या चान्सलर ग्रुपने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी घडविला भंडारा

गणेशोत्सवात युवकांचा सामाजिक उपक्रम

अहमदनगर- गणेशोत्सवानिमित्त शहरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम चालू आहे. केडगाव येथील चान्सलर ग्रुपने नगर-कल्याण रोड, नेप्ती येथील आनंदऋषीजी अपंग कल्याण केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी भंडार्‍याचे आयोजन केले. ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना भंडार्‍याचे वाटप करुन खर्‍या अर्थाने त्यांच्यासह गणेशोत्सव साजरा केला. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

केडगाव येथील पाच गोडाऊन प्रांगणात गेल्या 15 वर्षापासून चान्सलर ग्रुपच्यावतीने गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात येते. तसेच गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी यावेळेस कार्यक्रमात बदल करुन खर्‍या गरजूंपर्यंत भंडार्‍याचा लाभ पोहचविला आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वपरीने मदत करण्याचे आश्‍वासन ग्रुपच्यावतीने देण्यात आले. यावेळी ग्रुपचे मार्गदर्शक रवी टकले, सुशांत दिवटे, सचिन दारकुंडे, जयसिंग पठारे, संभाजी ढेरे, दादा भोसले, धीरज पाटील आदींसह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

सचिन दारकुंडे म्हणाले की, आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे. मात्र दिव्यांग मुले समाजातील दुर्लक्षीत घटक बनले असून, त्यांना आधार देण्याची खरी गरज आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी भंडार्‍याचे आयोजन करुन खर्‍या अर्थाने गणेशोत्सव साजरा करण्याचे समाधान मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सुशांत दिवटे यांनी ग्रुपच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिले जात आहे. समाजातील दुर्लक्षीत घटकांना खर्‍या अर्थाने मदतीची गरज असते. गणेशोत्सवात वंचित घटकांना आधार देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी चान्सलर ग्रुपचे युवक उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा