नाचणीच्या चकल्या

साहित्य – 1 वाटी नाचणी, पाव वाटी गव्हाचे पीठ, अर्धा चमचा तिखट, 1॥ चमचा तीळ, पाव चमचा ओवा, पाव चमचा हिंग, 2 टे. स्पून तेल/लोणी मोहनासाठी सव्वा वाटी पाणी.

कृती – सव्वा वाटी पाणी + मीठ + तिखट + हिंग + ओवा + तीळ तेल सर्व एकत्र करून गॅसवर ठेवा. खळखळून उकळी आली की त्यात नाचणी व गव्हाचे पीठ घाला. नीट ढवळा. 2 मि. झाका. नंतर गॅस बंद करा.

15-20 मिनिटांनी हे पीठ खूप मळून घ्या. नेहमीप्रमाणे चकल्या करा. झटपट तयार होणार्‍या, भाजणीची जरुर नसणार्‍या अशा या खुसखुशीत चकल्या दिसतात पण फारच सुंदर.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा