मंगलकार्यालयातून रोकड पळविली

अहमदनगर- लग्न समारंभातील घाई गडबडीचा फायदा घेवून अज्ञात चोराने नजर चुकवून 25 हजार रुपये चोरून नेले. ही घटना टिळक रोडवरील पटेल मंगलकार्यालय येथे गुरुवारी (दि.30) रात्री 8 ते 11 वाजल्याच्या दरम्यान घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, संजय साहेबराव सांगळे (रा.कामरगाव ता.नगर) हे लग्न समारंभाकरिता पटेल मंगल कार्यालय येथे गेले असता लग्न समारंभाच्या घाई गडबडीत कोणीतरी अज्ञात चोरांनी मंगलकार्यालायातील रूममधून 25 हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी संजय सांगळे यांच्या फिर्यादीवरून भादाविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस नाईक फुलमाळी हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा