नवलेनगरला भरदिवसा घरफोडी

अहमदनगर- आतून लोटलेला दरवाजा कोणीतरी अज्ञात चोरांनी उघडून आत प्रवेश केला. घरातील कॉटवर काढून ठेवलेले 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट चोरून नेले ही घटना गुलमोहोर रोडवरील पोलिस चौकी मागील नवलेनगर येथील रिद्धी सिद्धी टॉवर येथे रविवारी (दि.1) सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी राजेंद्र हिरामण बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून भाद्विक 454, 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पो.ना. जाधव हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा