सिद्धार्थनगर येथे 20 लाख रुपये खर्चून साकारले जाणार बुद्धविहार

अहमदनगर- सर्व समाजाने एकत्र येवून आपल्या विचाराची देवाण-घेवाण करावी. आजच्या युवा पिढीला, आपली संस्कृती, धार्मिक परंपरा, सण-उत्सव कळावे व तसेच गौतमबुद्धांचे विचार समाजामध्ये रुजवावे यासाठी सिद्धार्थनगर येथे 20 लाख रुपये खर्चून बुद्धविहार तयार करण्यात येणार आहे. माणुस माणसापासून लांब चालला आहे. आजच्या काळात समाज एकत्र येवून चांगल्या कामांची मुहूर्तमेढ लावावी. आमदारनिधी व शासनाच्या निधीचा उपयोग योग्य ठिकाणी करण्याचे काम मी केले आहे. शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना व निधी घेवुन गेलो आहे आणि त्याचा उपयोग समाजाला खर्‍या अर्थाने झाला त्यामुळे मला समाधान मिळाले असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

आ.संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून सिद्धार्थनगर येथे सुमारे 20 लाख रुपये खर्चुन बुद्धविहार कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, मा.नगरसेवक धनंजय जाधव, परिमल निकम, सुरेश बनसाडे, संजय कांबळे, संध्या मेढे, किरण दाभाडे, राजू दाभाडे, अजय साळवे, कौशल गायकवाड, संजय सत्रे आदींसह नागरिक उपस्थित होते.

उपमहापौर मालनताई ढोणे यावेळी म्हणाल्या, आ.संग्राम जगताप यांनी आपल्या कमी वयात आमदारकीची जबाबदारी यशस्वीपणे शहराला कामाच्या माध्यमातून दाखवून दिली. सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यामुळे सर्व समाज आज त्यांच्याबरोबर आहे. कुठेही पदाचा मीपणा दाखवला नाही. नगर शहरात अगदी साधेपणाने समाजाचे प्रश्न सोडविले. सिद्धार्थनगर झोपडपट्टीचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. या भागामध्ये सर्व सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

अभियंता परिमल निकम म्हणाले, बौद्धविहारच्या माध्यमातून समाज एकत्र होईल. समाजाचे विविध सामाजिक उपक्रम याठिकाणील साजरे करता येणार आहे. आ.संग्राम जगताप यांच्याकडे आम्ही 10 लाखांच्या समाजमंदिराची मागणी केली होती. परंतु आ. जगताप यांनी सुमारे 20 लाख रुपयांचा निधी बौद्ध विहारासाठी दिला.

किरण दाभाडे म्हणाले, सिद्धार्थनगर परिसरात सर्वसामान्य नागरिक रहात आहे. विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमास जागा नव्हती. आ.जगताप यांच्याकडे बुद्धविहाराची मागणी केली आणि त्यांनी ती पुर्ण केली आहे. समाजाच्या कामाला येणारे आ.जगताप आहेत. सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे आमदार संग्राम जगताप आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा