दि बुद्धिस्ट असोसिएशनतर्फे धम्मज्ञान परिक्षेचे आयोजन

अहमदनगर- बौद्ध संस्कार संघ, दि बुद्धिस्ट असोसिएशनच्यावतीने आषाढ पौर्णिमा ते आश्‍विन पौर्णिमा बौद्ध समाज वर्षावास साजरा करतात. यावर्षी प्रतिभा देठे यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ डॉ.भिमराव रामजी आंबेडकर लिखित ग्रंथावर आधारित 100 प्रश्‍न तयार करुन प्रत्येक प्रश्‍नाला तीन पर्याय आहेत.

ही परिक्षा 6 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहेत. 100 प्रश्‍नांची प्रश्‍नपत्रिका अभ्यासासाठी देण्यात येणार आहे. त्यापैकी 50 प्रश्‍न परिक्षेस असणार आहेत. परिक्षार्थिंनी हा ग्रंथ खंड 1 व खंड 2 चे वाचन करुन अचूक उत्तर द्यावयाचे आहे. ही परिक्षा सर्वांसाठी खुली आहे.

13 ऑक्टोबर रोजी होणार्‍या वर्षावास समाप्ती उत्सवात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम व परितोषिक वितरण होणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात ज्यांना बुद्ध वंदना, गायन, नृत्य आणि वक्तृत्व सादर करण्याची इच्छा असेल त्यांनी व प्रश्‍नपत्रिकेसाठी नावनोंदणी आवश्यक असून, अधिक माहितीसाठी मो.9881531188.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा