ब्रह्माकुमारीजने विश्व विक्रम करून केला जागतिक अभियंता दिन साजरा

अहमदनगर- ब्रह्माकुमारीजने विश्व विक्रम करून केला जागतिक अभियंता दिन साजरा नागठाणे (सातारा) – अभियंता दिन प्रतिवर्षी 15 सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो. याचे कारण हा दिवस भारतरत्न एम विश्वेश्वरैय्या यांचा जन्म दिवस आहे. जगभरात 143 देशात माहिलांद्वारे संचलित केल्या जाणार्‍या प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या नागठाणे सेवाकेंद्राच्या संचालिका डॉ. बी के सुवर्णा व डॉ. बी के दिपक हारके यांनी विश्वविक्रम करून जागतिक अभियंता दिन साजरा केला.

अण्णासाहेब कल्याणी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक महाडिक सर व पर्यवेक्षक म्हामुने सर यांचा मार्गदर्शनाखाली 1150 मुलांनी अभियंता दिन च्या आकारात बसून विश्वविक्रम केला याची नोंद इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये झाली आहे.

या विश्वविक्रमानंतर डॉ. बी के सुवर्णा यांचे 86 विश्वविक्रम तर डॉ. बी के दिपक हारके यांचे 153 विश्वविक्रम झाले आहेत या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बी के अंकिता व बी के देवदासभाई यांच्यासह आण्णासाहेब कल्याणी शाळेच्या सर्व शिक्षक वर्ग यांनी परिश्रम घेतले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा