शोध मेंदूतील नव्या सर्किटचा

मेंदूसंबंधीच्या विज्ञान क्षेत्रात शास्त्रज्ञांनी मोठे यश मिळविले आहे. या यशामुळे भविष्यात नैराश्य आणि चिंता यांसारख्या मानसिक आजारांवर उपचार करणे शक्य होणार आहे. संशोधकांनी मेंदूतील असे एक सर्किट शोधले आहे की, ते दोन विपरीत व्यवहार जसे की, आनंद आणि दु:ख या दोन वेगवेगळ्या स्थितीत काम करू शकते. हे संशोधन ‘न्यूरॉन’ नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

संशोधकांनी सांगितले की, मेंदूतील तांत्रिक कोशिकांचे वेगवेगळे गट सकारात्मक विचारादरम्यान आनंद शोधते. यावेळी नकारात्मक विचारापासून मुक्त होण्याचा प्रयत्न असतो. या कोशिकांचा नियंत्रित व्यवहार हा मानसिक आजार असलेल्यांना जास्त त्रासदायक ठरतो. उदा. नैराश्याने त्रस्त असलेले लोक अशी काही कामे बंद करतात की, त्यातून त्यांना पूर्वी आनंद मिळत होता. तसेच ते संभाव्य धोक्यापासून वाचण्यासाठी जास्त चिंता करण्याचा प्रयत्न करतात.