कलप केला गडप

एकदा काही जरुरीच्या कामासाठी बिरबल बादशहा आपल्या पांढऱ्या केसांना काळा कलप लावून महालात बसला होता.

संबंधित कामाच्या चर्चेत बराच वेळ गेला, तरी [बिरबल आपल्या काळ्या केलेल्या केसांचे कौतुक करीत नाही, हे पाहून त्याला त्या विषयाकडे वळविण्याच्या हेतुने बादशहाने विचारले,

“बिरबल, केसांना कलप लावल्याने त्याचा डोक्यावर काही अनिष्ट परिणाम होतो का रे?”

बिरबल म्हणाला, “खाविंद, केसांना कलप करून जवान बनू पाहणाऱ्या वृद्धांना मुळातच डोके नसते. त्यामुळे अनिष्ट परिणाम होण्याचा प्रश्नच नाही “.

“असं कसं म्हणतोस?” असा प्रश्न काहीशा रागातच बादशहाने केला असता बिरबल म्हणाला ,

“कलपाने केस काळे करून जवान होता येत नाही, हि संधी बाब ज्याला समजत नाही, त्याला डोके आहे असे कशाच्या आधारे म्हणायचे?”

बिरबलाचे हे सडेसात उत्तर एकूण बादशहाची चर्चा मात्र उतरली; आणि त्याचा कलप कायमचा गायब झाला.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा