भिंगारच्या गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक जल्लोषात

भिंगार- येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात व जल्लोषात शांततेत पार पडली. मिरवणुकीत 13 मंडळे सहभागी झाली होती. विद्युत रोषणाई व फुलांची सजावट प्रत्येक मंडळाने आपल्या गणराया भोवती केली होती. यामध्ये गणेश मंडळ ब्राह्मण गल्ली, सम्राट मंडळ, गवळीवाडा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पंचशीलनगर, समर्थ युवा प्रतिष्ठान दाणेगल्ली, नवरंग प्रतिष्ठान नेहरू चौक, अमरज्योत मंडळ जोशीगल्ली, साईबाबा प्रतिष्ठान पाटीलगल्ली, नवज्योत मंडळ, सावतानगर, सिद्धेश्वर मंडळ मळथडी, धाडगेमळा, महात्मा फुले मंडळ गोंधळेमळा. अमृतनाथ व महामहंकाली मंडळ वडारवाडी या मंडळांचा समावेश होता.

मिरवणूक मोठ्या उत्साहाने शांततेत पार पडली. रात्री 10 वाजता बँड स्पिकर पथक नियमानुसार बंद करण्यात आले. शेवगाव विभागाचे पोलिस उपाधिक्षक मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे सपोनि प्रविण पाटील व पोलिस कर्मचारी यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

मानाच्या गणरायाचे पूर्व परंपरेनुसार सायंकाळी सहा वाजता शुक्लेश्वर मंदिराजवळील झीरा विहिरीत विसर्जन करण्यात आले. मानाचा गणपती दुपारी 1-30 वाजता मिरवणूकिस निघाला. त्यापाठोपाठ ब्राह्मण गल्लीतील गणेश मंडळाचा गणपती निघाला. मात्र त्यानंतर थेट सायंकाळी पाच वाजता इतर मंडळे सहभागी झाली.

मिरवणुकीत सर्वच मंडळांनी फुलांची सजावट व विद्युत रोषणाई केली होती. बँडपथक व ढोलताशांच्या निनादात मंडळाचे कार्यकर्ते धुंद होऊन नाचत होते.

शिवसेना नगरसेवक रविंद्र लालबोंद्रे यांच्या नेतृत्वाखालील साईबाबा प्रतिष्ठान व शिवसेनेचे नागरदेवळे भागातील युवा नेते महेश झोडगे मळथडीतील सिध्देश्वर व्यायाम शाळा मंडळ, नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्य गोंधळे मळ्यातील महात्मा फुले मंडळ तसेच वडारवाडीतील महामहंकाली मंडळाची भव्य मिरवणूक होती. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत मंडळांनी गणरायाचे विसर्जन केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा