भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

अहमदनगर- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाच्या सहकार्याने गुरुवारी (5 सप्टेंबर) शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळेत विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, ग्रंथपाल व सेवक यांच्या भूमिकेतून एक दिवसाचे शालेय कामकाज पाहिले. तर शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक व्ही.एल. औटी तर अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड उपस्थित होते. श्री. दुगड म्हणाले की, गुरुशिवाय जीवनाला अर्थ नाही. गुरुंप्रती आदर व निष्ठा असणारे शिष्य जीवनात यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले. व्ही.एल. औटी यांनी सतत प्रयत्नशील असल्यास ठरवलेले ध्येय गाठता येते. त्यासाठी जिद्द व कष्ट करण्याचे त्यांनी आवाहन केले.

यावेळी पालक-शिक्षक संघाचे सदस्य, शाळा समिती सदस्य, आजी-माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा