भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

सभासदांना देणार 13 टक्के लाभांश

अहमदनगर- कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील श्री भैरवनाथ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रा. प्रल्हाद साठे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात झाली. त्यावेळी बोलताना त्यांनी सभासदांना 13% लाभांश देण्याचे जाहीर केले. त्यास उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात अनुमती दिली.

प्रा. साठे यांनी सन 2018-19 च्या वार्षिक अहवालाची आकडेवारीनुसार माहिती दिली. संस्था चाळीस-पंचेचाळीस टक्के स्वभांडवली असून ती सभासदांच्या स्वभांडवलावर स्वावलंबी बनवण्याचा संस्थेचा मानस आहे. सभासदांना ऋणको बरोबर धनको बनवण्याचे धोरण संस्थेने घेतले आहे. संस्थेने सभासदांसाठी ‘आनंद ठेव’ पेन्शन योजनाही सुरू केली आहे. पुढील वर्षांपासून सभासदांच्या 5 वी व 8 वी मधील विद्यार्थ्यांसाठी ‘भक्त प्रल्हाद’ स्कॉलरशीप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सभासदांच्या गुणवत्तेनुसार पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रतीमहा 100 रू. प्रमाणे 2 वर्षे स्कॉलरशीप दिली जाईल अशी माहिती प्रा. साठे यांनी दिली.

याप्रसंगी सभासदांचे स्कॉलरशीप पात्र, 10 वी-12 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी, नोकरीस लागेलेले युवक यांचा रोख पारितोषिके व गौरवचिन्ह देवून गौरव करण्यात आला. चि. रुद्र विजय साठे यास जे.एस.एस. गुरुकुल विद्यालयाचा स्टुडंट ऑफ द ईयर पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला.

ज्ञानदेव पांडुळे उर्फ मंत्री, भीमराव पांडुळे, रामदास पांडुळे, लक्ष्मण गांगर्डे, सौ. जनाबाई साठे यांचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ देवून सन्मान करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रा. प्रल्हाद साठे यांना ‘छत्रपती राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्ञानदेव पांडुळे यांनी संस्था राबवीत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करुन संस्थेची उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी अशी सद्भावना व्यक्त केली.

सभेस व्हा. चेअरमन पोपट गांगर्डे, संचालक रघुनाथ गांगर्डे, प्रा. नानाभाऊ अनभुले, पोपट निकाळजे, सोसायटीचे चेअरमन दादाभाऊ अनभुले, बन्सी अनभुले, सुर्यभान सटाले, सटाले, सचिव बाळासाहेब साठे, आबा गांगर्डे, सौ. वैजयंता साठे, भाऊसाहेब गांगर्डे, तुकाराम गांगर्डे, श्री. माने, श्री. साखला, मारुती शेरकर, दत्तोबा अनभुले, रामदास गांगर्डे, बालाजी गांगर्डे आदी सभासद उपस्थित होते. प्रा. नानाभाऊ अनभुले यांनी आभार मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा