परिपूर्ण ज्ञान बँकेच्या व स्वतःच्या प्रगतीला दिशादर्शक ठरते – उमेश एडके व सुनिता जव्हेरी

अहमदनगर- बँकेच्या दैनंदिन यंत्रवत कामकाजात अचूकता व बँक ग्राहकांशी आत्मविश्‍वासाने सौजन्यशिल सेवा देण्यासाठी मार्गदर्शन वर्गातून मिळणारे परिपूर्ण ज्ञान बँकेच्या व स्वत:च्या प्रगतीला दिशादर्शक ठरते, असे मत प्रवरा सहकारी बँक (शेड्युल्ड बँक) या बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश एडके व अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या मनमाड रोड, शाखाधिकारी सुनिता जव्हेरी यांनी व्यक्त केले.

अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांतील सेवकांसाठी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग फायनान्स मुंबई यांच्यावतीने होणार्‍या बँकिंग क्षेत्रातील महत्वपूर्ण जेएआयआयबी या स्पर्धांत्मक परिक्षेच्या मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांत कार्यरत पहिल्या प्रयत्नात या देशपातळीवरील स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या या अधिकार्‍यांचे हस्ते अभिनवरित्या या मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन झाले.

प्रशिक्षित कर्मचारी हा बँकेचा आत्मा असून ज्ञानजिज्ञासू सेवक वर्ग हा बँकेच्या भक्कम पायावरील जिंदगी (Assets) असल्याने अशा स्पर्धात्मक परिक्षा उत्तीर्ण असलेल्याची शैक्षणिक अर्हतेचे महत्व भारतीय रिझर्व्ह बँकेने अधोरेखित करुन तसे आदेशही परिपत्रकान्वये जारी केले, असे असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.

वसई जनता सहकारी बँकेचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक नाईक व पुण्याच्या जनता सहकारी बँक या मल्टीटेट शेड्युल्ड बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक विजय दुनाखे यांनी मार्गदर्शन वर्गातील विषयावर उद्बोधक मार्गदर्शन केले.

असोसिएशनचे अध्यक्ष सीए गिरीष घैसास यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष नाथा राऊत यांनी आभार मानले व कार्यलक्षी संचालक अशोक कुरापाटी यांनी सूत्रसंचालन केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा