एटीएममधून कितीही वेळा विनाशुल्क पैसे काढता येणार

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत अर्थमंत्री निर्मला सितारामण सामान्यांसाठी एटीएम चार्जबाबत घोषणा केली आहे. पुढील तीन महिन्यापर्यंत कोणत्याही बँकेतील एटीएममधून पैसे काढल्यानंतर कोणताही चार्ज लावण्यात येणार नाही. डेबिडकार्ड धारक एटीएममधून कितीही वेळा पैसे काढू शकतो. त्यावर कोणताही चार्ज लावण्यात येणार नसल्याची आहे.

तसंच, बँक खातेधारकांना, आपल्या खात्यात मिनिमम बॅलेन्स ठेवण्यााबाबतही सूट देण्यात आली आहे. आता बँक खातेधारकांना, खात्यात मिनिमम बँलेन्स ठेवण्याची गरज नाही. कोरोनाच्या व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमध्ये अनेक शहरांत लॉकडाऊनची स्थिती आहे. अशात अनेक लोक घरातून बाहेर पडत नाही. त्यामुळे खातेधारक आता जवळच्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून विनाशुल्क पैसे काढू शकणार आहे.