गुजराथ-राजस्थान येथील धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी नगर जिल्ह्यातुन 200 भाविक रवाना

अहमदनगर- सर्व वयोगटातील भाविकांना गुजराथ, राजस्थान येथील विविध धार्मिक स्थळांच्या दर्शनाचा लाभ व आनंद मिळावा. धार्मिक स्थळांचे महत्व समजावून घेऊन अधिक माहिती व्हावी यासाठी नगरमधील युवकांनी स्थापन केलेल्या श्री आनंद जैन तीर्थयात्रा संघाच्यावतीने गुजराथ-राजस्थान येथील धार्मिक स्थळांच्या यात्रेस रविवारी सकाळी साधूसंतांच्या मंगल संदेशाने प्रारंभ करण्यात आला.

या दहा दिवसांच्या यात्रेसाठी संघाच्यावतीने भाविकांकडून अत्यल्प दर घेतला गेला असून दहा दिवसाच्या या यात्रेत प्रवासाची चार बस (2×2 लक्सरी) निवासाची, प्रसादाची, वैद्यकीय सेवा या सर्वांचा या यात्रेत समावेश आहे. अनेक वर्षांपासून अशा यात्रेचे नियोजन संघाच्यावतीने ना नफा ना तोटा या तत्वावर केले जात असून श्री सकल जैन संघाचे यासाठी सहकार्य असते.

यंदाच्या वर्षी यात्रेचे नियोजन संघाच्यावतीने आनंद ट्रॅव्हल्सचे ईश्वर धोका तसेच धनेश कोठारी, राजू मेहेर, मनोज बाफना, राजेश बोरा, निलेश ताथेड, राहुल सुराणा, सुधीर बाफना, यश बलदोटा यांनी केले असून या यात्रेमध्ये हे सर्वजण हिरारीने सहभागी होतात.

या यात्रामध्ये वणी, कामरेज चोघडी, सरदार सरोवर, मणी लक्ष्मी, शकेश्वर, म्हयसाना, महुडी, आगलोड, अंबाजी, पावापुरी, भीरूतारकंधाम, जिरावाला, भिनमाल, नाकोंडाजी, रामदेवरा, ओशियाजी, मंडोर, विरामी, आशापूर, सोनाजी खेतलाजी, मुछला महावीर, राणकपूर, केशरियाजी या गुजराथ व राजस्थान येथील तीर्थस्थळांचा समावेश आहे. 23 सप्टेंबर रोजी ही यात्रा परतेल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा