दि अंबिका महिला सहकारी बँकेस‘ सर्वोत्कृष्ट बँक 2019’ पुरस्कार

अहमदनगर- दि अंबिका महिला सहकारी बँकेला महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशन मुंबई यांचा राज्यातील महिला बँक गटातुन सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार 2019 जाहीर झाला आहे. 24 सप्टेंबर रोजी मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते व फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे. अशी माहिती बँकेच्या अध्यक्षा डॉ. सौ. लता फिरोदिया यांनी दिली.

याप्रसंगी बँकेच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. सौ. संध्या जाधव म्हणाल्या की, बँकेचा व्यवसाय 130 कोटीचा असून लेखापरिक्षण वर्ग अ तसेच निव्वळ एन.पी.ए 0.56% राखण्यात बँकेला यश आलेले आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन यांच्याकडून देखील अहवाल वर्ष 2018-2019 करिता अल्प एन.पी.ए. राखल्याबदद्ल बँकेचा सन्मान करून गौरव करण्यात आले आहे.

बँकेच्या संस्थापिका प्रा. मेधाताई काळे म्हणाल्या की, बँकेला सातत्याने चांगल्या कामगिरीबदद्ल सर्वोत्कृष्ठ बँकेचा पुरस्कार मिळत आहे. यावर्षीही तो मिळाल्याने सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह गतीमान ग्राहक सेवा देणे अशी कामे संचालक मंडळाने प्राधान्याने हाती घेतलेले आहेत. बँकेच्या सर्व संचालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश गायकवाड, सर्व सेवकवर्ग, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांच्यामुळेच हा पुरस्कार बँकेला मिळाला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा