प्रेरणादायी अक्षरधन

माझी आई

घरात काम करणार्‍यांना आपल्या मुलांच्या आधी कपडे शिवणारी, शुद्ध व सात्त्विक चारित्र्याला जगात कुणाचे भय नाही असे मनावर कोरणारी, प्रेमही कधीही रिती न होणारी बँक आहे हे आपल्या वागण्या, बोलण्यातून सदैव शिकवणारी माझी आई माझं पहिलं विद्यापीठ होती, आहे व राहील.

मैत्री

मैत्री कुणाशी जुळावी हा योग नाही तर चॉईस आहे. जाणीवपूर्वक मित्र निवडता येतो आणि एकदा अशी मैत्री फुलली की त्या फुलण्याचा आनंद शब्दातीत असतो. यात एकमेकांना भक्कम साथ देणं अभिप्रेतच असते म्हणूनच तर अशा अवीट गोडी लाभलेल्या मैत्रीला देश, प्रांत, धर्म, जातपात, भाषा असा कोणताही बांध आडवा येत नाही.

वैखरीची सुंदरता (वाचाळता नसावी)

खरा ज्ञानवान हा मितभाषी असतो. खरा धनवान हा काटकसरी असतो. मनन. चिंतन, वाचन, लेखन यासाठी लागणारी मानसिकता मौनामुळे अन् ध्यानामुळे सिद्ध होते. प्रत्येकाने जगाच्या कल्याणासाठी जरी नाहीतरी वाचाशुद्धीसाठी बोलणे थोडे कमी करावे. सतत, सटरफटर बोलण्याने वाचाळता वाढते अन् वैखरीची सुंदरता जाते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा