शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यासह स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

अहमदनगर – विद्या प्रतिष्ठानच्या केडगाव रेल्वेस्टेशन येथील डॉ. हेगडेवार संकुलातील सरस्वती विद्यालयाच्या स्नेहसंमेलन संस्थेचे कार्यवाह सोमनाथ दिघे यांच्या अध्यक्षतेखाली व ब्युटी एक्स्पर्ट व सिनेकलावंत अनुजा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन अनुजा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते सहभागी कलावंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण, कोषाध्यक्ष अरुणराव धर्माधिकारी, विश्वस्त सतिष झिकरे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अशोकराव पुंड, उपाध्यक्ष दत्ताजी जगताप, प्राचार्य डॉ. रविंद्र चोभे, नगरसेवक मनोज कोतकर, गिगाबाईट कॉम्प्युटरचे संचालक वायकर सर, राधेशाम कुलकर्णी, दादासाहेब काजळे, महेश कांबळे, बाळासाहेब दाणी, मुख्याध्यापक प्रसाद जमदाडे व संदीप भोर हे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे सुप्तगुण ओळखून कलेला व व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन पालकांनी व शिक्षकांनी द्यावे, असे प्रतिपादन अनुजाताईंनी केले. या सांस्कृतिक कार्यक्रमात शिवराज्याभिषेक सोहळा, नशामुक्ती नाटिका, वाहतूक सुरक्षा पथनाट्य या कार्यक्रमासह विविध नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी दाखवले.

अनेकांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी विद्यार्थी, पालक वर्ग व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा