गुणवत्तेसाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात – जी. डी. खानदेशे 

अहमदनगर- गुणवत्तेसाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे. या संस्थेतील शाळांमध्ये प्रवेश मिळणे हे त्या पालकांचे भाग्य आहे. 140 वर्षाची उज्वल परंपरा असलेली ही शहरातील एकमेव संस्था आहे. कोणताही प्रशासकीय अधिकारी बदलून नगरमध्ये आल्यास कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा? असा प्रश्‍न केल्यास आम्ही देखील फिरोदिया हायस्कूलचे नाव सुचवित असल्याचे जी. डी. खानदेशे यांनी मोठ्या मनाने सांगितले.

आपल्या गुणवत्तेचा ठसा जिल्ह्यासह राज्यात उमटविणा-या अहमदनगर एज्युकेशन सोसायटीने विद्यार्थ्यांना काळानुसार अद्यावत ज्ञान देण्यासाठी शाळेत ई- लर्निंगचा अवलंब केला आहे. या ई-लर्निंग व शालेय वेबसाईटचे उद्घाटन जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे सचिव जी. डी. खानदेशे यांच्या हस्ते झाले.

यावेळी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छाया फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, विश्‍वस्त गौरव मिरीकर, सल्लागार समितीचे सदस्य भूषण भंडारी, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे प्राचार्य उल्हास दुगड, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य प्रभाकर भाबड, रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या कुसुम मावची आदींसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी सतत बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेत आहे. गुणवत्ता हेच ध्येय समोर ठेऊन विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्यासाठी ई लर्निंग सुरू करत असल्याचे सांगून, त्यांनी नवीन ई-लर्निंग व वेबसाईटची माहिती दिली.

तर ई लर्निंगमुळे मुलांना पुस्तकातील संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने समजवण्यासाठी मदत होणार आहे. माझे स्वतःचे मुले व नातू फिरोदिया हायस्कूलमध्ये शिकून मोठे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेच्या यशस्वी वाटचालीत योगदान देणा-या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी यांच्यासह संचालक मंडळाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

प्राचार्य उल्हास दुगड यांनी अध्यक्षांचा परिचय करून दिला. प्राचार्य प्रभाकर भाबड यांनी ई-लर्निंग विषयी पालकांना विस्तृतपणे माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गुगळे यांनी केले. आभार प्राचार्या कुसुम मावची यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा