अपघात होऊ नये म्हणून शिव चिदंबर फाऊंडेशनने कॉंनकेव्ह मिरर बसविला

नगर- दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शिव चिदंबर फाऊंडेशनने भव्यदिव्य पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहेत दहा दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, प्रतिष्ठान दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवित आहे तोच आदर्श ठेऊन आज पाईपलाईनरोड एकविरा चौकाकडून गावडेमळाकडे जाणार्‍या श्री श्री रविशंकर जी मार्ग व इस्कॉन मंदिराकडे जाणार्‍या वळणावर अपघात होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने कॉंनकेव्ह मिरर बसवण्यात आला आहे.जेणेकरून शालेय विद्यार्थी व सर्वांनाच यामध्ये न दिसणारी वाहने दिसतील व अपघात होणार नाही व वळ्णावरील येणारी वाहने दिसतील या मिररचे उद्घाटन अनिल गीते पाटील व श्री. कांबळे यांच्या हस्ते व फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व गावडेमळा रहिवासी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावर्षी गणेश मूर्तीचे पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून तहसीलदार श्री. व सौ. मंडलिक तसेच सौ. व श्री. एकनाथ काकडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महिलांनी फेटे तर पुरुषांनी एक सारखा ड्रेस परिधान केला होता यामध्ये बालवृंदही सहभागी झाले होते फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन कुसळकर, राम जरांगे, परेश खराडे, गिरीश गायकवाड, अमित बुरा, नितीन धुमाळ, रामेश्वर राऊत, विकास बडे, सचितानंद पवार, दीपक नेमाडे, सतीश मस्के, प्रवीण शेळके, गोविंद कदम, राजेंद्र वाबळे, डॉ.महेश बोरकर, शशीअण्णा कुरेमुसा, विजय गांगर्डे, विजय बर्डे, मेजर शेकडे, आढाव मेजर, प्रा क्रांती मुंदानकर, वंदना कुसळकर, हिवाळी मेजर, संभाजी जाधव सर, सुभाष तळेकर, विजय गायके, विजय चित्राल, विष्णू सब्बन, वसंत पारधे, रामदास पांढरे आदी उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या काळात शिव चिदंबर फाउंडेशनने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आयोजन केले आहे यामध्ये विविध स्पर्धा, आदर्श शिक्षक गुणगौरव, देशभक्तीपर चित्रपट, मंगळागौर कार्यक्रम, म्युझिकल तंबोला, होम मिनिस्टर आदी कार्यक्रम होणार आहे सामाजिक एकोप्याच्या जोरावर विकास करण्यासाठी शिव चिदंबर फाउंडेशन हे नेहमी प्रयत्नशील आहे असे कार्यकारी मंडळाने सांगितले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा