भिंगारचा पाणीप्रश्‍न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

नगर- भिंगार शहराला गेल्या आठ दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांवर वणवण भटकंती आली आहे. याबाबत एम.आय.डी.सी. प्राधिकरणाला आठ दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला असून, याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कॅन्टोंमेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष व भिंगार कॉंग्रेस अध्यक्ष ऍड.रामकृष्ण पिल्ले यांनी दिला आहे. एमआयडीसी प्राधिकरण, एमईएस आणि अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्ड प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने भिंगारकरांचे पाण्यावाचून हाल सुरु आहे. डोक्यावर हंडा घेऊन भटकंती करण्याचे दिवस पुन्हा येथील नागरिकांवर आली असून, संतप्त नागरिकांनी रस्त्यावर येण्याची तयारी दर्शविल्याने भिंगार कॉंग्रेस आंदोलनाच्या पावित्र्यात आहे, असे ऍड. पिल्ले यांनी म्हटले आहे.नगर शहराला जसा होतो, तसा भिंगारला मुळा धरणातून थेट पाणी पुरवठा व्हावा, मुळा धरणातून एमआयडीसी प्राधिकरणाला पाणी पुरवठा होतो, प्राधिकरण एमईएस ला आणि त्यानंतर भिंगारला एक दिवसाआठ पाणी वाढीव दराने मिळते. यात सुधारणा न झाल्यास भिंगार शहर कॉंग्रेस रस्ता-रोको आंदोलन करणार आहे, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

या निवेदनावर ऍड.पिल्ले, कॉंग्रेस प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, राहुल ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रिजवान शेख, माजी जिल्हा सरचिटणीस ऍड. साहेबराव चौधरी, कोषाध्यक्ष सुभाष त्रिमुखे, जिल्हा प्रतिनिधी संजय झोंगगे, सरचिटणीस निजाम पठाण, उपाध्यक्ष संतोष धीवर, महिला अध्यक्षा मार्गरेट जाधव, सेवादल अध्यक्ष संतोष फुलारी आदिंच्या सह्या आहेत.

भिंगारला पाणी परिषद घेणार

यासर्व बाबी विचारात घेऊन भिंगारला पाणी परिषद घेण्याचा मानस ऍड.पिल्ले यांनी व्यक्त केला असून, परिषदेसाठी या भागाचे खासदार, आमदार, पालकमंत्री, कॅन्टोंमेंट बोर्ड उपाध्यक्ष, सदस्य आदिंना निमंत्रित करण्यात येणार आहे, ही ते म्हणाले. या आंदोलनात सर्व पक्षिय कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांसह विविध संघटनांचाही सहभाग व्हावा, अशा अपेक्षने पिल्ले यांनी आवाहन केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा