पोस्ट खात्याची सेवा सुरु झाल्याने वकिल व पक्षकारांचा वेळ वाचणार-न्या. कमलाकर कोठेकर

अहमदनगर – जिल्हा न्यायालयात वकिल व पक्षकारांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी कायम प्रयत्नशील असतो. कोर्टामध्ये पोस्ट खात्याची सेवा सुरु झाल्यामुळे वकिल व पक्षकारांचा वेळ वाचणार असून, टपाल सेवा अधिक गतीमान होणार आहे, असे प्रतिपादन न्या.कमलाकर कोठे यांनी केले.

जिल्हा न्यायालयात वकिल व पक्षकारांच्या सोयीसाठी सुरु करण्यात आलेल्या पोस्ट खात्याच्या सेवेचा शुभारंभ प्रधान जिल्हा न्यायाधिश कमलाकर कोठेकर यांच्या हस्ते टपाल पेटीची फित कापून करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधिश सुहास माने, न्या. एस.आर. जगताप, न्या. व्ही.बी.बांबर्डे, न्या. अशोककुमार बिलाटे, न्या. एम.बी.देशपांडे, न्या. ए.टी. कुलकर्णी, न्या. एन.एल. काळे, न्या. बी.एम.चिकणे, न्या. सत्यनारायण नावंदर, वकिल संघटनेचे अध्यक्ष अँड. शेखर दरंदले, उपाध्यक्ष अँड. गजेंद्र पिसाळ, सचिव अँड. प्रसाद गांगर्डे, खजिनदार अँड.राजेश कावरे, सहसचिव अँड.सुनिल आठरे, सरकारी वकिल अँड. केदार केसकर, अँड. सुमतीलाल बलदोटा, अँड.साहेबराव चौधरी, कोर्ट मॅनेजर कृपावरम, जीपीओचे सहाय्यक अधिक्षक बी.पी.एरंडे, डाकनिरिक्षक संदिप हदगल आदिंसह न्यायिक अधिकारी, कर्मचारी व वकिल उपस्थित होते.

प्रास्तविकात अध्यक्ष अँड.शेखर दरंदले म्हणाले, वकिल व पक्षकारांना सातत्याने पत्रव्यवहार करावा लागतो. त्यामुळे वकिलांचा व पक्षकारांचा वेळ व पैसा वाचावा यासाठी पोस्ट खात्याकडे रितसर मागणी करुन व पाठपुरवठा केल्यामुळे जिल्हा न्यायालयामध्ये ही पोस्ट सेवा सुरु झाली आहे. सुरुवातीला येथून टपाल सेवा मिळणार असून, पुढील काळात पोस्टाच्या सर्व सेवा मिळणार आहेत. त्यामुळे पक्षकार व वकिलांनी या पोस्टाच्या सेवेचा लाभ घ्यावा. दिवसांतून दोनवेळा ही पत्र पेटी उघडण्यात येणार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा