पाचवर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या संस्थापातळीवरील प्रवेशासाठी मुदतवाढ

अहमदनगर – पाचवर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या फेरीत प्रवेश मिळू शकला नाही परंतु सामाईक प्रवेश पात्रता परीक्षा उत्तीर्ण आहेत व ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाने संस्था पातळीवरील प्रवेशाची संधी उपलब्ध करुन दिलेली आहे.

14 ऑक्टोबरपर्यंत संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश परीक्षा गुणवत्ता पत्र घेऊन महाविद्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन येथील न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य एम.एम.तांबे यांनी केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे विहित मुदतीत अर्ज दिलेले आहेत त्यांची गुणवत्ता यादी 17 ऑक्टोबर रोजी दुपारी महाविद्यालयाच्या सुचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल. अधिक माहितीसाठी टेलिफोन नं. 2324074 किंवा प्रा.रामेश्‍वर दुसुंगे यांचा भ्रमणध्वनी क्र. 7249740575 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा