मनपा आरोग्याधिकारी पैठणकरांवर पुन्हा निलंबनाची कारवाई

नगर – आरोग्य विभागात बदली होऊनही घनकचरा व्यवस्थापन विभागाचा कार्यभार न सोडणार्यु आरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांच्यावर मनपा आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार सूचना देऊनही कार्यभार न सोडल्यामुळे व अनधिकृतपणे कामकाज सुरू ठेवल्याने त्यांच्यावर पुन्हा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरोग्याधिकारी पैठणकर यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा घनकचरा विभागात नियुक्त करण्यात आले होते. मात्र, चौकशी सुरू असल्याने त्याच विभागात पुन्हा नियुक्ती कशी दिली? असा सवाल करत शिवसेनेने प्रशासनाला धारेवर धरले होते.

शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आयुक्तांनी पैठणकर यांच्या बदलीचे आदेश धाडले. त्यांना आरोग्य विभागात वैद्यकीय आरोग्याधिकार्यां च्या अधिनिस्त कामकाज पाहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, पैठणकर यांनी यालाही आक्षेप घेत कार्यभार स्वतःकडेच ठेवला होता. आयुक्तांच्या आदेशानुसार त्यांना कार्यभार सोडण्याबाबत दोन वेळा नोटीसही बजावण्यात आली. खुलासाही मागविण्यात आला.

त्यानंतरही त्यांनी कार्यभार न सोडल्यामुळे व आयुक्तांचा आदेश धुडकावल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्याबाबत सुरू असलेल्या सर्व चौकश्या एकत्रितपणे करण्यात येतील. बदली आदेश न पाळल्याप्रकरणीही त्यांची चौकशी होईल. येत्या महिन्याभरात चौकशी पूर्ण करणयाचे निर्देश देण्यात आले असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त भालसिंग यांनी सांगितल

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा