सराईत गुन्हेगारावर एनपीडीए अंतर्गत कारवाई

अहमदनगर – समाजात धोकादायक व्यक्ती असलेल्या भुर्‍या उर्फ मुजीब अजीज खान (वय 30, रा. मुकुंदनगर) याच्या विरूध्द पोलिसांनी एनपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून त्यास 1 वर्षाकरीता स्थानबध्द केले. ही कारवाई शुक्रवारी (दि.13) केली.

नगर जिल्ह्यातील धोकादायक व्यक्ती तसेच वाळु तस्कर, अवैध धंदे करणारे व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांच्या विरूध्द कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक यांनी दिले होते. त्या अनुषंगाने मुकुंदनगर परिसरातील धोकेदायक असलेला भुर्‍या उर्फ मुजीब अजीज खान (वय 30, रा. मुकुंदनगर) याच्या विरूध्द कारवाई करून त्यास पोलिसांनी अटक केली व एक वर्षाकरीता नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले. मुजीब खान याच्या विरूध्द कॅम्प पोलिस ठाण्यात दंगा, हाणामारी, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्य वधाचा गुन्हा, आर्म अॅक्ट यासह अन्य गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल झालेले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार मधुकर शिंदे, हे.कॉ. मन्सुर सय्यद, हे.कॉ. मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, पो.ना. रवींद्र कर्डिले, पो.कॉ. किरण जाधव, पो.ना. दीपक शिंदे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अक्षय फलके यांनी केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा