रिक्षा टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

अहमदनगर- भरधाव वेगात जाणार्‍या रिक्षा टेम्पोने दुचाकीस्वारास धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना मनमाड रोडवरील सावेडी येथे घडली.

भरधाव वेगात जाणारा रिक्षा टेम्पो (क्र.एम. एच.12, ई.क्यु.7548) ने दुचाकीस्वारास धडक दिली. या धडकेत राम मच्छिंद्र शिंदे (वय 35, रा.वैदुवाडी, सावेडी) हा दुचाकीस्वार जखमी झाला. अपघात होताच रिक्षा टेम्पो चालक घटनास्थळावरुन पसार झाला. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी राम शिंदे यांच्या फिर्यादीवरुन अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.