आध्यात्मिक मोती (जागृत जीवनाकरीता) – प्रभु सज्जन- दुर्जनांची काळजी करतात

हसन संत राबियांच्या झोपडीमध्ये गेले आणि त्यांनी त्या श्रीमंत माणसाची इच्छा त्यांना सांगितली. राबिया बसरी यांनी हसन बसरी यांचेकडे तिरप्या कटाक्षाने पाहिले आणि त्या श्रीमंत माणसाच्या भेटीचा अस्वीकार करित त्या म्हणाल्या, जर परमेश्वर अभक्तांचे, निंदकांचे पालन-पोषण करतात तर मग जे त्यांच्यावर प्रेम करतात अशा भक्तांचे पालनपोषण करणार नाहीत का ?

जे प्रभुची निंदा करतात अशांनाही भोजन देण्यास प्रभु मनाई करीत नाहीत तर जे त्यांचे भक्त आहेत आणि ज्यांचा आत्मा प्रेमाने ओतप्रोत आहे अशा लोकांना भोजन देण्यास कसे मना करतील?’’