आध्यात्मिक मोती (जागृत जीवनाकरीता) – प्रभुची अनंत रुपे

एका धार्मिक परिवारातील सर्व सदस्य रात्रीच्या जेवणाच्या वेळी प्रार्थना करीत होते. त्यावेळी त्यांचे वडील प्रार्थनेच्या शेवटी प्रभुला आवाहन करीत की ‘‘हे प्रभु तु आमचा अतिथी बनून ये आणि आमच्या भोजनाचा आनंद घे.’’ अशाच प्रकारे प्रत्येक रात्री परिवाराचा पिता प्रार्थना करून जेवायला बसत. प्रत्येक वेळी त्यांच्यातील लहान मुलगा वडीलांची प्रार्थना लक्षपूर्वक ऐकत असे.

एक दिवशी लहान बालकाने आपल्या वडिलांना विचारले की, ‘‘आपण प्रत्येक रात्री जेवणाच्या वेळी प्रभुला येण्यासाठी का प्रार्थना करतात? ’झ ‘‘जर प्रभु कधी येतच नाहीत?’’ वडिलांजवळ यावर काहीही उत्तर नव्हते तरीही त्यांनी म्हटले की, ‘‘बघ बाळा आम्ही वाट पहातच राहू. मला विश्वास आहे की परमेश्वर प्रत्येक रात्री आमचे निमंत्रण (प्रार्थना) ऐकत आहेत.‘‘

मुलगा म्हणाला कि, ‘‘बरे बाबा, आपण जर खरोखर अपेक्षा ठेवता की रात्री भोजनाच्या वेळी परमेश्वर येईल आपण भगवंतासाठी एखादे स्थान राखीव का ठेवत नाही? खरेच आपण सदिच्छेने वाट पहाता की, प्रभु येतील तर त्यांच्यासाठी एखादे रिकामे स्थान ठेवणे आवश्यक आहे.‘‘

मुलाच्या या प्रतिक्रियेमुळे आणि प्रश्नामुळे वडिल लज्जित झाले. त्याच्या प्रश्नांना पुर्ण विराम म्हणून वडिलांनी भोजनाच्या टेबलावर एक स्थान सुरक्षित केले जेथे त्याने एक चांदीचे सुबक भांडे, एक ताट व रूमाल व एक ग्लास ठेवला. जेव्हा त्याने टेबलावर प्रभुच्या ताटाची सजावट केली तेव्हा दरवाजावर खटकट आवाज आला तेव्हा मुलाला खुपच आनंद झाला कि आता प्रभु येतीलच.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा