जिल्ह्यात आशा व गटप्रवर्तकांचे तीन दिवस मुक मोर्चा व आंदोलन

अहमदनगर- आशा आणि गट प्रवर्तकांच्या मानधन वाढीच्या मागणीबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असली तरी कागदोपत्री त्याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही त्यामुळे आशा व गटप्रवर्तक संघटनेने सुरु केलेले आंदोलन आजही सुरु असून 14, 15 आणि 16 सप्टेंबर रोजी मुकमोर्चा व महापुरुषांच्या पुतळ्यांसमोर मुक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सदरचे आंदोलन होत आहे. मानधन वाढीबाबत राज्यसरकार जोपर्यंत जीआर काढत नाही तोपर्यंत लढा सुरु ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक भूमिका घेऊन राज्यसरकार लेखी स्वरुपात त्याबाबत निर्णय जारी करत नसल्याचे संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी अॅड.कॉ.सुधीर टोकेकर यांनी म्हटले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा