एसटी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे गुरुवारी विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन

अहमदनगर – एसटी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अहमदनगर विभागाच्यावतीने 23 जानेवारी रोजी सर्जेपुरा, कोठला येथील अहमदनगर एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील एसटी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे सचिव गोरख बेळगे, अध्यक्ष बलभीम कुबडे, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, खजिनदार परदेशी, विठ्ठल देवकर, सावंत, केळकर, चेमटे, पांडव, कर्डिले यांनी केले आहे.

एसटी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक 19 डिसेंबर 2019 रोजी औरंगाबाद येथे झाली होती. या उच्चाधिकार समितीच्या बैठकीमध्ये एसटी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक होत नसल्याने दि.23 जानेवारी रोजी राज्यव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर एसटीच्या विभागीय कार्यालया समोर सकाळी 10 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. एसटी पाससाठी विधवा महिलांची वयाची अट 75 वरुन 65 न करता पुर्वी प्रमाणे ठेवावी, तसेच विधवांनाही सहा महिन्याच्या पासेसची सुविधा मिळावी, बसची संख्या कमी असल्याने पासधारक कर्मचार्‍यांना सर्वच गाड्यांमधून प्रवास करण्याची सवलत द्यावी, पासची मुदत जानेवारी ते डिसेंबर अशी ठेऊन दोन दोन महिन्यांचे तीन पास द्यावेत, चालकांचे वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असतानाही स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज घेऊन त्यांना कुठलेही लाभ दिले जात नसून, त्यांना तातडीने लाभ द्यावे, उपदान ग्रॅच्युइटीची रक्कम त्वरित मिळावी व इतर प्रश्‍नांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा