आदर्श व्यापारी मित्र मंडळाचा समाज व पोलीस बांधवांना एकत्र करण्याचा व सुसंवाद वाढविणारा स्तुत्य उपक्रम – सागर पाटील (जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक)

अहमदनगर- गणेशोत्सव विसर्जन काळातच नव्हे तर सलग दहा दिवस पोलिसांना आपले कर्तव्य बजवावे लागते. स्वतःचे आजार, घरच्या समस्या विसरून जे काही मिळेल ते खाऊन कर्तव्य पार पाडणार्‍या पोलीसना चांगला व पौष्टिक आहार देण्याचा स्तुत्य उपक्रम आदर्श व्यापारी मित्र मंडळ व महावीर चषक परिवाराने राबविला आहे. हा उपक्रम पोलीस बांधवांना एकत्रित करणारा व सुसंवाद वाढविणारा आहे असे मत जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी व्यक्त केले.

आदर्श व्यापारी मित्रमंडळ व महाविर चषक क्रिकेट ग्रुपतर्फे गणेश विसर्जन मिरवणूक बंदोवस्तातील सर्व पोलिसांना (जेवण) फूडपॅकेटचे वाटप कापडबाजार भिंगारवाला चौक येथे सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस अधिकारी प्रांजली सोनवणे- पोळ, वर्षा इंडस्ट्रीजचे राजाभाऊ लुणिया, महावीर भोजनालयाचे मिलापचंद पटवा, मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ताथेड, उपाध्यक्ष नफीस चुदिवाला, मर्चंट बँकेचे संचालक संजय चोपडा, डॉ.सचिन बोरा, ब्रिजमोहन मालू, अजय गुगळे, जैन धर्मशाळा अध्यक्ष राजेंद्र गांधी, प्रवीण शिंगवी, विकास सुराणा, लक्ष्मीकांत शेटिया, अनिल दुग्गड, किरण पोखरणा, अमित पितळे, अशोक फुलडहाळे, मनिष चोपडा उपस्थित होते.

पोलीस बांधवांच्या या उपक्रमासाठी वर्षा इंडस्ट्रीजचे राजाभाऊ लुणिया यांचे सतत दरवर्षी बहुमोल सहकार्य लाभते, तसेच यावर्षी महावीर भोजनालयाचे मिलापचंद पटवा यांनी सहकार्य केले, या दोघांचा जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील व्यापारी नागरिक उपस्थित होते.

मोहरम व गणपती शांततेत व चोख बंदोवस्तात पार पाडल्या बद्दल मंडळातर्फे अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस अधिकारी प्रांजली सोनवणे- पोळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते व परिसरातील व्यापारी उपस्थित होते.

प्रवीण आहेर व विष्णू आहेर यांनी विसर्जन मार्गावर मंडळाच्यावतीने काढलेली आकर्षक रांगोळीची पहाणी करून सर्वांनी कौतुक केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा