कै. खाशाबा जाधव राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी पै. संदिप डोंगरे याची निवड

नगर- न्यू आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविद्यालयाचा खेळाडू पै.संदिप डोंगरे याची ऑलम्पिक पदक विजेते कै. खाशाबा जाधव 5 वी युवा (ज्युनिअर) ग्रिको रोमण राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान वारकरी शिक्षण संस्था, चाकण रोड, आळंदी देवाची (ता. खेड, जि.पुणे) येथे होणार्‍या या स्पर्धे त तो अहमदनगर जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

नुकतेच निमगाव वाघा (ता. नगर) येथे ऑलम्पिक पदक विजेते कै.खाशाबा जाधव राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्याची निवडचाचणी घेण्यात आली. यामध्ये पै. संदिप डोंगरे याची 77 किलो वजनगटात निवड झाली आहे. निवड झाल्याबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशी, सहसचिव ऍड. विश्‍वासराव आठरे, खजिनदार डॉ. विवेक भापकर, प्राचार्य भास्करराव झावरे, उपप्राचार्य डॉ. अरुण पंधरकर, प्रा. आर. जी. कोल्हे, डॉ. एम. व्ही. गिते यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पै. डोंगरे याला शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद मगर, धनंजय लाटे, धन्यकुमार हराळ, जिल्हा तालिम संघाचे खजिनदार पै. नाना डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभल

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा