राज्यस्तरीय थ्रोबॉल पंच परिक्षेत नगरच्या 10 क्रीडाशिक्षकांची निवड


अहमदनगर -महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन, नगर जिल्हा थ्रोबॉल असोसिएशन, द्रोणा अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय थ्रोबॉल पंच परिक्षेत नगरच्या 10 क्रीडाशिक्षकांची निवड करण्यात आली. द्रोणा अॅकॅडमी राहाता येथे पंच परीक्षा व प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या पंचपरीक्षा व शिबिरासाठी राज्य भरातुन क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक सहभागी झाले होते.
अहमदनगर जिल्ह्यातून अशोक कांगणे, सुजय बाबर, गणेश म्हस्के, बाळासाहेब कोतकर, हनूमंत गिरी, शशिकांत म्हस्के, आण्णासाहेब गोपाळ, भागवत उगले, किशोर पवार, योगेश उगले हे राज्यस्तरीय थ्रोबॉल पंच परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
या यशाबद्दल परमपुज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊली, संत परमानंद महाराज, संत निजानंद महाराज, संत विवेकानंद महाराज, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनिल धाबर्डे, सचीव किरण फुलझेले, कार्याध्यक्ष कैलास माने, द्रोणा अॅकॅडमीचे अध्यक्ष जयराज दंडवते पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर , महाराष्ट्र राज्य क्रीडा विकास परिषदेचे सरचिटणीस ज्ञानेश काळे, अहमदनगर जिल्हा थ्रोबॉल असोसिएशनचे सचीव गणेश म्हस्के यांनी अभिनंदन केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा