अभिनेता रणबीर कपूर – आलिया भट्टचा लवकरच साखरपुडा

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर – आलिया भट्ट लवकरच साखरपुडा करून त्यांच्या नात्याला नाव देणार असल्याचं म्हटलं जात आहे. कपूर कुटुंबातील चौथी पिढी अभिनेता रणबीर लोकप्रिय निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या मुलीशी आलियाशी लग्न करणार आहे. दोन्ही कुटुंबांनी जूनमध्ये साखरपुड्यासाठी परवानगी दिली असून याचवर्षी शेवटच्या महिन्यात हे दोघं विवाहबंधनात अडकू शकतात .

नुकतेच दोघं पण न्यूयॉर्कमध्ये नवीन वर्ष साजरं करून परतले आहेत. यावेळी तिच्यासोबत ऋषी कपूर, नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर, भरत साहनी आणि मुलगी समारा म्हणजे ऋषी कपूर यांच संपूर्ण कुटुंब होतं.

रणबीरच्या बहिणीने रिद्धिमाने आलियाला गिफ्ट म्हणून अंगठी दिली असून त्यावर ‘AR’ असं लिहिलं आहे.अंगठीच्या अगोदर रिद्धिमाने आलियाला एक सुंदर हिऱ्यांचा महागडा ब्रेसलेट देखील गिफ्ट केला असून आता रिद्धिमा या दोघांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्याचं समजत आहे.

 

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा