सुविचार

सततं कुरू कर्म त्वं अकर्मादरुर्ग तिस्सदा ।

उद्योगे विद्यते योगः कर्मसु कौशलम् ॥

‘‘तू अखंड कर्म करीत रहा. कारण अकर्मामुळे-आळसमुळे दुर्गती निश्‍चित प्राप्त होते.’’ उद्योग (उत्+योग) या शब्दांतच उत्कर्षाप्रत नेणारा योग ओतप्रोत भरलेला आहे. विचारपूर्वक कर्म करणे याचेच नाव योग.

सुविचार : आळस हा उद्योगाचा व भाग्याचा थोर शत्रू आहे. आळशी मनुष्याचे मन हेच सैतानाचे घर। आळसाने मनुष्य दुर्गुणी दुर्व्यसनी, दरिद्री व दुर्भागी बनतो. म्हणून दैववादी बनू नका व आळसाने दुःखी, दुर्देवी होऊ नका, प्रयत्न हाच ‘परीस’ आहे. ‘प्रयत्न-परीसच’ लोखंडाचं सोनं बनवतो.

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा