क्रीडा शिक्षकांच्यावतीने आयर्नमॅन डॉ. महेश मुळेंचा गौरव

अहमदनगर – धावणे, जलतरण आणि सायकलिंग या तीन बाबी दिलेल्या वेळेत पुर्ण करणार्‍याला ऑस्ट्रेलियात होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आयर्नमॅन हा किताब दिला जातो. हा किताब मिळविणारे नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचे चिरंजीव अस्थीरोग तज्ञ डॉ.महेश मुळे यांचा क्रीडा शिक्षक व संघटनांच्यावतीने गौरव करण्यात आला.

याप्रसंगी दत्तात्रय नारळे, मुकेश मुळे, आप्पासाहेब शिंदे, डॉ.विजय म्हस्के, विजय जाधव, सुधाकर सुंबे, राजेंद्र कोतकर, शिरीष टेकाडे, बाळासाहेब मुळे, सुरेशराव बोठे, शिवाजी धामणे, किसन माने, परसराम साबळे, दास गुंड, संजय भापकर, महावीर नारळे, कैलास कोरके, भाऊसाहेब पवार, पोपट कोतकर, हरीभाऊ दरेकर, राजश्री बोठे, मच्छींद्र अमृते, दिलीप मगर, चंद्रकांत अमृते, गणेश भापकर, महेश म्हस्के आदि उपस्थित होते.

समुद्रामध्ये 1.9 कि.मी. पोहणे, 90 कि.मी. सायकल चालवणे, 21 कि.मी. धावणे या 70.3 मैलाचे अंतर सलग आठ तासाच्या आत पार करणार्‍याला आयर्नमॅन हा किताब दिला जातो. ऑस्ट्रेलियातील बुसेल्टन येथे सदर स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. भारतातून 5 स्पर्धक यामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यातील पुरुष स्पर्धकातून एकमेव डॉ. महेश यांना हा बहुमान मिळाला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा