सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे आज लोकार्पण

भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे आज लोकार्पण होणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४३ वी जयंती आहे. त्याचेच औचित्य साधत या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे.

देशाचे लोह पुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार पटेल यांना विविध स्तरातून श्रद्धांजली दिली जात आहे.जगातील या आठव्या आश्चर्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.सरदार पटेल यांचे हे शिल्प जगातील सर्वात उंच शिल्प आहे.या पुतळ्याची उंची १८२ मीटर आहे. शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारला आहे. देशाच्या जडणघडणीतले सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान फार मोठे आहे. तसेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचमुळे सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुषही म्हटलं जातं

हा जगातील सर्वात उंच पुतळा असणार आहे. हा पुतळा अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही उंच आहे. नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाजवळ तो उभारण्यात आला आहे. लोकार्पण सोहळ्यासाठी भव्य तयारी करण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रन फॉर यूनिटीला हिरवा झेंडा दाखवला.राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकैया नायडू आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सरदार पटेल चौकात सरदार वल्लभभाई पटेलांना श्रद्धांजली वाहिली. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती देश राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करत आहे.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा