तब्बल 45 कोटींची कार

प्रसिद्ध अभिनेता जेम्स बॉंडच्या चित्रपटात वापरण्यात आलेली एक कार अॅस्टॉन मार्टिेन डीबी5 नुकत्याच करण्यात आलेल्या एका लिलावात ठेवण्यात आली होती. तेथे या कारला 6,385,000 डॉलर म्हणजे तब्बल 45.37 कोटी रुपये किंमत मिळाली. यामुळे ही कार आजपर्यंची सर्वात महागडी बॉंडकार ठरली. 1965 ची मॉडेल असलेल्या अॅस्टॉन मार्टिेन डीबी 5 या कारला ‘बॉंडकार’ म्हणूनही ओळखले जाते. या कारला जगातील एक प्रसिद्ध कार म्हणून ओळखले जाते.

या कारचा वापर ‘गोल्डफिंगर’ आणि ‘थंडरबॉल’ या चित्रपटांच्या प्रमोशनमध्येही करण्यात आला होता. डीबी 5 ही कार खासकरून इयॉन प्रॉडक्शनसाठी तयार करण्यात आली होती. या कारमध्ये 13 ओरिजनल स्पेशल मॉडिफिकेशन्स रिस्टोअर करण्यात आले होते, जे चित्रपटात प्रत्यक्ष दाखवण्यात आले होते. उल्लेखनीय म्हणजे हे सर्व मॉडिफिकेशन ऑस्कर विजेते स्पेशल इफेक्ट एक्सपर्ट जॉन स्टिअर्स यांच्या कल्पनेतील होते. जॉन यांच्या कल्पनेप्रमाणे या कारमध्ये मशीन गन, बुलेटप्रूफ शिल्ड, ट्रॅकिंग डिवाईस, रिवॉल्विंग नंबर प्लेट, रिमूवेबल रुफ पैनल, ऑईल स्लिक और नेल स्प्रेयरबरोबच स्मोक स्क्रीनचही सोय आहे.

अॅस्टॉन मार्टिेन डीबी 5 या बॉंड कारला लिलावापूर्वीच्या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. लिलावात बोली लावण्यासाठी केवळ 4 मिनिटे 30 सेकंदाची वेळ देण्यात आली होती. या लिलावात सहा कंपन्यांनी प्रत्यक्ष तर एका कंपनीने फोनवरून भाग घेतला होता. लिलावस्थळी उपस्थित राहून बोली लावणार्या एका बॉंडचाहत्याला कार विकण्यात आली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा