शिवाजी चव्हाण यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

अहमदनगर – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते शिवाजी चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी आ.अरुण जगताप, आ.संग्राम जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, प्रा.माणिक विधाते, नगरसेवक संपत बारस्कर, शिवाजी डाके, सागर कोल्हे, संजय कांडेकर, धीरज उकिर्डे, प्रशांत घाडगे, योगेश दुबे, सतिष ढवण, श्रीनिवास कनोरे, संकेत शिंगटे, राजेंद्र तागड, तुषार यादव, नितीन अव्हाड, अंकुश चत्तर, सागर ढवण, मच्छिंद्र वामन, विकास ढवण, प्रदीप करांडे, अभिषेक ढवण, नवनाथ बारस्कर, तेजस तागड, सत्यजित ढवण, पप्पू भवर, पप्पू वारुळे, गणेश रोडे, प्रथमेश तागड आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार नगरमध्ये आले असता चव्हाण यांनी जाहिर प्रवेश केला. शिवाजी चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादीने शहरामध्ये विकासाला चालना दिली. सर्वसामान्यांची प्रश्‍न सोडविण्यास राष्ट्रवादी कटिबध्द असून, युवा वर्ग देखील याकडे आकर्षित झाला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा